तरुणाला नग्न करून केली बेदम मारहाण
एका 23 वर्षीय तरुणाला बेदम मारहाण करून धारदार शस्त्राने अनेक ठिकाणी भोसकून निर्घृणपणे हत्या करण्यात आला व नग्नावस्थेत मृतदेह झुडुपात फेकून मारेकरी फरार झाले. ही घटना आज सकाळी पडेगाव परिसरातील पॉवर हाऊससमोर घडली. या घटनेने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली असून पोलीस मारेकर्याचा शोध घेत आहे.
मोहम्मद अझहर मोहम्मद हनिफ वय-23 (रा.अन्सार कॉलोनी) असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. पडेगाव पॉवर हाऊस जवळील मोकळ्या जागेत आज सकाळी काही नागरिक प्रांतविधीसाठी गेले असता नग्नवस्थेत एक तरुण जखमी अवस्थेत झुडुपात पडलेला दिसला. ही माहिती नागरिकांनी नियंत्रण कक्षाला कळविली व तातडीने पोलीस उप आयुक्त निकेश खाटमोडे, साह्ययक आयुक्त डॉ.दिनेशकुमार कोल्हे, गुणाजी सावंत, गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल गायकवाड, छावणी पोलीस ठाण्याचे निरीक्षक मनोज पगारे फॉरेन्सिकचे पथक, डॉग स्कॉड यांनी घटनस्थळ गाठले. तेथे मृतदेहाची पाहणी केली असता डोक्याच्या पाठीमागील भागात गंभीर जखम, कंबरेत धारदार वस्तूने भोसकल्याचे व गुडघ्याला व हाता पायांना बेदम मारहाणीचे व्रण आढळून आले. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठविला. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे कळते. ही हत्या का व कोणी केली हे दुपारपर्यंत स्पष्ट झालेले नव्हते.
पहाटे तीन वाजता घरी येऊन गेला
मृत अझहर हा पहाटे तीन वाजता घरी आला होता व रोहनकडे जाऊन येतो असे घरच्यांना सांगून घराबाहेर पडला. मात्र तो घरी आलाच नाही सकाळी त्याच्या मृत्यूची बातमी घरच्यांना कळाली.
मृत गुन्हेगारी वृत्तीचा
मृत अझहर हा गुन्हेगारी प्रशवभूमीचा होता.त्यावर या पूर्वी अनेक प्रकारचे आरोप झालेले होते.त्याचे अनेकांशी वाद होते. जुन्या वादातूनच अजहरची हत्या झाली असावी असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.